काल डॉन पाहिला.

इतर चित्रपटांप्रमाणे यातही दिग्दर्शक मधे मधे बेपत्ता होत होता बहुतेक.

अमिताभ एरवी उगीचच्या उगीच गुंडांच्या डोक्यांवरून (नसलेल्या) उड्या मारत असतो. मात्र जेव्हा प्राण त्याचा रस्ता अडवून उभा असतो तेव्हा मात्र तो त्याच्याशी दोन हात करतो.

याचा उलगडा पुढे होतो बहुतेक जेव्हा शेवटच्या हाणामारीत अमिताभ, झीनत आणि प्राण तिघेही अशा उड्या मारतात. (प्राण ला पण उडी मारता येते हे अमिताभला कळते बहुतेक ... अतींद्रिय शक्ती?) पण प्राणच्या पायाला गोळी लागलेली असते ज्याने तो नीट चालूही शकत नाही, पण दणादण उड्या मारतो.

एवढेच नव्हे. प्राण त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन एका जाडजूड दोरीवरून चाललेला असतो. एक गुंड ती दोरी कापतो आणि प्राण आणि त्याची मुले असे तिघे तीच दोरी पकडून दुसऱ्या इमारतीच्या पायाशी उतरतात. बिल्कुल न आपटता. कसे काय देव जाणे.

(चंबित) ॐ