वळवाचा पाऊस » निकाल येथे हे वाचायला मिळाले:
काल दहावीचा निकाल लागला, तसा हा महिना निकालांचाच महिना, पहिले बारावी मग CET आणि आता दहावी. सतत कुठला ना कुठला निकाल लागतोय. आपला निकाल मात्र केव्हाच लागलाय, दहावी काय नि बारावी काय ते डोंगर केव्हाच मागे पडलेय, सध्या आयुष्याची गाडी सरळसोट मार्गावरून धावतेय. रोजचा दिवस सारखाच… विशेष असं काहीच नाही. सकाळी उठून आवरून ऑफीस गाठणे, ऑफीस मधली कामं उरकने, परत सगळं पटापट आवरून घर गाठणे आणि रात्रीचा सगळं आवरून निद्राधीन होणे. किती तरी दिवस झले हे असंच रुटीन चाललंय, शनिवार, रविवार त्याला जरा अपवाद आहेत पण तेही थोड्या फार फरकाने सगळे सारखेच. ...
पुढे वाचा. : निकाल