१) ".....मराठीत लिहिलेल्या मूळ कवितेसाठी असे बंधन घातलेले नाही."
मला वाटतं कविता याचाच अर्थ छंदबद्ध आविष्कार. नुसते विचार एका खाली एक लिहीले तर ती कविता होत नाही. मुक्तछंदाला देखील एक लय असते नाहीतर गद्य आणि पद्य यात फरक तो काय? छंदबद्धतेचं बंधन कवितेला हवच मग ती मराठी असो की अनुवाद असो. मूळ मराठी कवितेसाठी एक आणि अनुवादासाठी वेगळे धोरण ठेवू नये.
२) रसग्रहण गद्यात असते त्यामुळे या धोरणाचा रसग्रहणावर काहीही परिणाम होणार नाही. सध्या मानस करत असलेल्या उर्दू गज़लच्या रसग्रहणाबाबत असा प्रश्न आला नव्हता.
संजय