नरेंद्रजी, आपल्या प्रतिसादाबद्दल व पाठबळ देणाऱ्या शब्दांबद्दल मनः पूर्वक धन्यवाद! मोठमोठ्या लेखक-लेखिकांच्या अजरामर कलाकृतींचे अनुवाद करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे! मला तर अजिबात वाटत नव्हते माझ्याकडून ह्या काव्याचा अनुवाद होईल म्हणून! कारण काव्य प्रांतातील व गद्य लिखाणातील माझा अनुभव अगदीच त्रोटक आहे. परंतु केवळ आणि केवळ त्या मूळ काव्याचा आशय व भावना मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी हे धार्ष्ट्य केले. कितीही शोधून मला या काव्याचा मराठी अनुवाद मिळाला नाही हे त्यामागील मुख्य कारण होते. असो. आपल्या प्रतिक्रियेने हुरुप वाढला. आभार.