जेंव्हा धनंजय/शंतनु माने सरपोतदारांचा बंगला सोडून काळभोर बाईंच्या बंगल्यात मुक्काम हालवतात तेंव्हा...
दोन्ही बायका (सुधा/पार्वती... सचिन/बेर्डे) सरपोतदार बाईंना नमस्कार करत नाहीत, याबद्दलचा राग सरपोतदार बाई माने कंपनी गेल्यावर व्यक्त करतात.
पण धनंजय (अशोक सराफ) काळभोर बाईंच्या बंगल्या बाहेर या दोन्ही बायकांना(?) "आता इथे तरी पाया पडा" असा काहीसा दम देतो.
(शंकेला वाव असला तरी ही दिग्दर्शकाची नजरचूक आहे असे वाटते.)
===
एक निरीक्षण...
काळभोर बाई फक्त दोन/तीन "सीन" वगळता नेहेमी घरातल्या जिन्याच्या शेवटच्या दुसऱ्या-तिसऱ्या पायरीवरून उतरताना दाखवल्या आहेत.
===
शेवटची पाणचट आणि रुचीहीन मारामारी वगळता या चित्रपटात निखळ मनोरंजन आहे!