"हे वाक्य सावरकरांचे आहे की नाही माहिती नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. अगदी राणी पण जेव्हा तिच्या दत्तकपुत्राला वारस म्हणून इंग्रज संमती देईनात तेव्हाच बंडात सामील झाली."

विनायक राव, ते सावरकरांचे वाक्य नाही ! १८५७ चे स्वातंत्र्य समर ह्या पुस्तकातून ह्या कथेचा पाया घातला आहे. मला  श्री. वि.दा.सावरकरांचे लिखाण अधिक आवडते म्हणून त्यांची लेखन शैली बहुतांश कायम ठेवून व काही भाग आशय न बदलता येथे प्रसिद्ध केले आहेत.

त्याच बरोबर जदूनाथ सरकारांची लेखन शैली पण मला आवडते त्यांच्या 'फॉल ऑफ द मुघल एम्पायर' ह्या पुस्तकात त्यांनी दोघांची हात न आखडता तारिफ केली आहे- ते दोघे आहेत - अर्थातच तात्या टोपे व मंगल पांडे - स्वतःच्या स्वार्थासाठी न लढता हे दोघे फक्त हिंदुस्तानी स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने लढले असे जदूनाथांचा अभ्यास आहे. पुढे जाऊन जदूनाथांनी - इंग्रजांनी तात्यांबद्दल अत्यंत धोकादायक "D Man" असा स्पष्ट उल्लेख केला आहे व कोणत्याही परिस्थितीत ह्या माणसाला जिवंत पकडायच्या ऑर्डर्स काढलेल्या होत्या.

प्रत्येक मराठी माणसाला ह्या गोष्टी चा अभिमान वाटला पाहिजे की, इंग्रजांनी तात्या टोपेंचा इतका धसका घेतला होता की, बरेच वर्ष इंग्रज सैन्यात मराठी माणूस टॉप रँक ऑफिसर बनवायला ते धजावले नाहीत.   

आपण दोघांनीही न.र.फाटकांच्या बद्दल म्हटले आहे - मी अजून श्री. फाटकांचे एकही पुस्तक वाचलेले नाही पण आता मलाही त्यांच्या लेखनाबद्दल उत्सुकता आहे. जदूनाथ सरकारांची पुस्तकेही मिळाल्यास जरूर वाचा. सावरकर व सरकार ह्यांची पुस्तके कादंबरी स्वरूपात नसल्याने वाचायला कंटाळा येण्याची शक्यता आहे पण निश्चित इतिहासावरील माहितीपूर्ण आहेत.

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद !