सुमारे १८ वर्षांपूर्वी मी हरिहरेश्वरला सहकुटुंब गेलो होतो. तेथे समुद्रकिनाऱ्यालगत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे आश्रयस्थान (रिसॉर्ट) आहे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यासाठी पुण्याहून नोंदणी केलेली होती. स्वारगेटाहून एस टी होती. वरंध घाटामार्गे कोकणपट्टीत उतरण्याचा पहिलाच अनुभव होता. कोकण रेल्वेचे काम तेव्हा ऐन भरात होते. दोनच दिवस तेथे होतो पण समुद्रकिनारा, हरिहरेश्वराचे मंदिर वगैरे ठिकाणी आनंदात वेळ गेला होता. स्वतःचे वाहन असते तर जास्त चांगले झाले असते असे वाटते. ( हा अनुभवअगदी जुना आहे आणि आता बराच फरक पडलेला असणार असे वाटते.)