हल्ली वर्तमानपत्रांतूनदेखील हिंदी शब्द सरसकट वापरायची फॅशन आली आहे. उदाहरण म्हणून "ढाचा" आणि "पर्दाफाश" हे दोन शब्द. या शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द असतीलच, नाही का? कोणाला माहीत असतील अथवा सुचत असतील तर कळवावे. 
तसेच "दस्तऐवज" हा मराठी शब्द असूनदेखील काही काही (म्हणजे पुण्याबाहेरच्या सर्व) वृत्तपत्रांतून "दस्तावेज" असा शब्द वापरलेला आढळतो. 
-महेंद्र (ह्युस्टन/ अमेरिका) 
टीपः मी वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्यांबद्दल बोलत आहे. कागदी आवृत्त्यांत काय असते ते मला माहीत नाही.