उदाहरण म्हणून "ढाचा" आणि "पर्दाफाश" हे दोन शब्द. या शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द असतीलच, नाही का?

ढाचा ह्या शब्दासाठी रूपरेषा असा शब्द डोळ्यापुढे येत आहे. इतर आणखीही शब्द असतील. ... पण नवे नवे शब्द मराठीत आले तर ते बरेच आहे. एखाद्या शब्दासाठी मराठीत जास्त शब्द असले तर त्याच्या निरनिराळ्या छटांसाठी ते वापरता येतात. (उदा. त्याची पत्नी निस्सीम प्रेम करते; पण खर्च बेसुमार करते)

हे शब्द नुसते प्रथमा एकवचनात वापरून सोडून दिलेले आहेत की इतरही प्रकारे मराठी व्याकरणाचे नियम पाळून वापरलेले आहेत ते पाहावे. जर ते मराठी व्याकरणाचे नियम पाळत असतील तर ते मराठीच्या घरात सुखासमाधानाने नांदत आहेत असे समजणे उचित होईल. उदा. 'पर्दाफाशात', 'ढाच्यात' अशी रूपे आढळतात का ते पाहावे. (नामाला लावलेला सप्तमीचा एकवचनी  'त' प्रत्यय मराठी स्वरूपाचे द्योतक आहे असे मला वाटते. )