राणी किंवा इतर संस्थानिकांचा ब्रिटीशांनी आधिकार नाकारला म्हणून ते बंड अथवा युध्दात सामील झाले हे अन्यायकारक मत आहे.
आपण अश्या गोष्टींचे विश्लेषण अथवा मत आजच्या स्थितीवरून काढत असतो. त्यामूळे चुकीच्या मताचा शिरकाव होण्यास नकळतच वाव मिळतो.
ब्रिटिशांनी जेंव्हा तैनाती फौजेची कल्पना मांडली आणि संस्थानिकानी त्याचा स्विकार केला तेंव्हा परीस्थितीची अपरिहार्यता म्हणूनच दोन्ही बाजूनी या कल्पनेचा स्विकार केला. यूध्दाच्या नियमाप्रमाणे जशी जशी स्थिती अनूकुल - प्रतिकुल होत जाते तेंव्हा काहीतरी खुसपटे काढून पूर्वीचे तह मोडीत निघत असतात.
त्यामूळे दत्तक मानले अथवा न मानले हे बाह्य कारण समजावे. इतक्या घाईघाईचा निर्णय यासर्व देशभक्तांवर अन्यायकारक ठरेल असे माझे मत आहे.
अर्थात या विषयावर सखोल चर्चा व्हावी असे मी सुचवेल.
द्वारकानाथ