आमच्या कार्यालयांतील एका मुलीनें कार्यालयातल्याच एका मुलाला गुपचुप एक पत्र लिहिलें आणि गुपचुप दिलें. तो ते घेऊन त्वरित एकटाच डायनिंग रूममध्यें गेला. त्यानें तें पत्र वाचलें. फाडून टाकलें आणि कचऱ्याच्या टोपलींत टाकलें. दुसऱ्या एका भोंचकभवानीनें तिला कांहींतरी त्याच्या हातांत देतांना पाहिलें. त्याच्यावर नजर ठेवली. तो डायनिंगरूमधून परत आल्यावर ही भवानी तिथें गेली. कांहीं मिळालें नाहीं. डस्ट बीनमध्यें पाहिलें कागदाचे कपटे दिसले. जमा केले. दुसरे दिवशीं सकाळी लौकर सर्वांपूर्वी कार्यालयांत आली. कोडें जुळवावें तसे सगळे तुकडे जोडून पुन्हां अखंड पत्र तयार केलें. पण बोंबाबोंब मात्र केली नाहीं. ही गोष्ट फक्त तीन जणींनाच ठाऊक होती. मला नंतर दोनतीन वर्षांनीं पत्रलेखिका नोकरी सॉडून गेल्यानंतर दुसऱ्या भोचकभवानीकडून कळली.
मजेदार आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.
सुधीर कांदळकर