इतका अवघड शब्द रूढ होण्याची शक्यता कमीच! त्यापेक्षा पर्याभ्रमण चालून जाईल. भ्रमण आणि पर्यटन(=नियोजनोत्तर भ्रमण) यांत अर्थाच्या थोड्या वेगळ्या छटा आहेत. तो फरक कायम ठेवायचा असेल तर इको-टुअरिझमकरिता पर्याटन म्हणता येईल. इकोफ्रेन्डलीकरिता पर्यावरणानुकूल असा शब्द आहेच, तोही पर्यानुकूल असा सुटसुटीत करता येईल.
रिझॉर्टसाठी धाम आणि निधान हे शब्द आधीपासून आहेत. आरोग्यधाम, आरोग्यनिधान यांत ते वापरांत आहेत. असेच शब्द गिरिधाम, विपिनधाम, राननिधान, मरुधाम, समुद्रतटधाम या पद्धतीने बनवायला हरकत नाही.
डेडिकेटेड=खासगी ( वाहन ).