सुरेख लेखन. गावठी/रायवळ आंब्यांवरही लिहा ना थोडे.

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
बाजारात अखेरीस...(थोडा पॉज) रायवळ आंबे आले.

अशी अवस्था गावठी आंबाप्रेमींची होते. गावठी आंबे 'अळणी' लागतात असे काही खोडसाळ लोक म्हणतात पण हापूस-केसर खाऊन कंटाळा आल्यावर त्यावर उत्तम उतारा म्हणजे गावठी आंबा. अस्सल गावठी/रायवळ आंबा म्हणजे भीमाशंकर, डिंभा, वाडा, गंगापूर, आमोंडी वगैरे आंबेगांव-खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील. पुण्यात हे आंबे फारसे पाहावयास मिळत नाहीत. एक तर हापूस-केसरच्या तुलनेत फार नाशिवंत माल. दोन दिवसात खराब होतात. आणि पावसाळ्यात त्यांची वाहतूक करणेही जिकीरीचे असते.