श्री.योगप्रभू आणि सुधीर कांदळकर,
गावठी आंब्यांविषयी लिहिण्याचे किंवा आंब्यांच्या जातीविषयी लिहायचे मनात नव्हते. एका मान्यवर दैनिकातल्या एका लेखाला प्रतिक्रिया म्हणून हा लेख लिहायला घेतला. पण मूळ लेख जालवासीयांनी वाचला नसण्याची शक्यता,त्यामुळे येणारी संदर्भहीनता, जाललेखनामधली सतत नावीन्याची आवश्यकता, ताजेपणा राखण्याची गरज, हे गुणविशेष लक्षात घेऊन लेखाचा रोख बदलला.
गावठी, रायवळ आंब्याबाबत लिहिण्यासारखे बरेच आहे. बघू या लवकरच. आपल्या अनुरोधाबद्दल आणि आस्वादाबद्दल आभार.