नमस्कार,
आम्ही सहकुटुंब नुकतेच आंबोलीला जाऊन आलो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गेलो होतो. फारच छान वातावरण होते. आता पाऊस असणार, पण तरीही जाऊ शकता. माझीही मुलगी अडीच वर्षांची आहे. पण तिथे काहिही अडचण आली नाही. आम्ही Hotel whistling Woods मध्ये राहिलो होतो. फोन न. ०२३६३-२४०२२९ मालक - श्री. ओगले. राहण्याची सोय उत्तम आहे. जवळच MTDC च्या hotel मध्ये आम्ही जेवायला जात होतो. तिथे गव्हाची पोळी, तांदुळाची भाकरी मिळते. त्यामुळे मुलांच्या जेवणाचे अजिबात हाल झाले नाहित.
पुण्यावरून सातारा, कोल्हापुर, निपाणी आणि तिथून आंबोलीकडे जाणार्या रस्त्याची चौकशी करावी.
आमची ट्रिप खुपच छान झाली. पाहा तुम्हीही विचार करून ठरवा.