सर्व प्रतिक्रिया लक्षात घेऊन एकच उत्तर लिहावे अशा अपेक्षेने लिहायला घेतले पण ऍक्सेस डीनाइड ही सूचना झळकली. (माझी काहीतरी चूक असेल.) त्यामुळे वैयक्तिक उत्तरे लिहीत आहे. गावठी आंब्यांविषयी न लिहिल्याचे कारण प्रभूयोगेश आणि श्री कांदळकर यांच्या उत्तरात लिहिले आहे तेच.रायवळ आंबा हा अगदी काळजातला, जिवाभावाचा विषय आहे. रायवळ आंब्याविषयी व्यासंगाने लिहिण्यासारखेही आहे. पण जालीय लेखनाला संदर्भप्रचुर आणि नुसते माहितीपर लेखन मानवत नाही.तेव्हा जालानुरूप असे तीनेकशे शब्द लिहायचे मनात आहे. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे अधिक हुरूप येईल. मनापासून धन्यवाद.
ता. क. आपली 'दोनोळी' सुरेख आहे!