आजानुकर्ण यांना
शुद्धलेखनाच्या नव्या नियमाप्रमाणे (आता हाही नियम तसा खूपच जुना झाला आहे; पण म्हणण्याची आपली एक पद्धत! ) ज्या अनुस्वारांचा उच्चार होत नाही किंवा ज्या अनुस्वारामुळे (म्हणजे हा अनुस्वार असला काय किंवा नसला काय)हा अनुस्वार असला काय किंवा नसला काय) संबंधित शब्दाच्या अर्थात कुठलाही फरक पडत नाही, असे अनुस्वार वगळण्यात आलेले आहेत. पूर्वीच्या लेखनपद्धतीनुसार गांव, नांव इत्यादी शब्दांमधील गा, ना या अक्षरांवर अनुस्वार देण्यात येत असत. आता असे अनु्स्वार देण्यात येत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. (काही मान्यवर अजूनही जुन्या शुद्धलेखनपद्धतीनुसार अनुस्वार देऊन लिहितात, पण हे प्रमाण खूपच तुरळक आहे.)
गाव, नाव यांसारख्या अनेक शब्दांवरील / अक्षरांवरील हे ओझे उतरविण्यात आलेले आहे ; पण तरीही काही 'अक्षरे' आपल्या कपाळावर असे 'अनुस्वार' एखाद्या (पितळ उघडे पडलेल्या, मुलामा उडालेल्या) आभूषणाप्रमाणे मिरवत असतात! अनुस्वाराचे निरर्थक, निरुपयोगी ओझे वाहत असतात...
हा शेर प्रतीकात्मक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
'अक्षरे' म्हणजे 'सद्यकालीन (निष्किय) माणसे' आहेत, असे समजले आणि 'अनुस्वार' म्हणजे 'गतकालीन वैभवाच्या (पोकळ) बढाया' आहेत, असे समजले तर या शेराचा थोडा का होईना अर्थ तुम्हाला लागू शकेल, असे वाटते. :)
'अक्षरे' आणि 'अनुस्वार' या शब्दांसाठी आणखीही कितीतरी प्रतीके कल्पिता येतील.
दिलखुलास प्रतिसादाबद्दल आणि मनमोकळ्या शंकेबद्दल मनापासून आभार.