अगदी खरे आहे.
काही बाबतीत आग्रही; प्रसंगी दुराग्रहीही; राहायलाच हवे.  
मीही अगदी शास्त्रशुद्ध मराठीच्या बाजूचा आहे; पण अशा बाबतीत कुणा एकट्याच्या हाती काहीच नसते. सरकारातील मूठभर लोक जे काही ठरवतील, त्यापुढे एकट्यादुकट्याचे काहीच चालत नाही... आणि अलीकडे मराठीची जी दशादशा झालेली आपण पाहतो, ती बघता अनुस्वार गळाल्याचे दुःख अगदीच किरकोळ वाटते.

अर्थात कोणता शब्द कुठल्या संदर्भात वापरला जात आहे, ते लक्षात घेऊन काही शब्दांवर अनुस्वार आजही आवश्यक आहेत, हे नाकारताच येणार नाही. उदाहरणार्थ :  तुम्ही वर सांगितलेले उदाहरण. पण त्यासाठी मराठी भाषा बारकाव्यांनिशी, तिच्या सांस्कृतिक, साहित्यिक संदर्भांनिशी ठाऊक असायला हवी.
यासंदर्भात आजचे चित्र सुखावह आहे, असे म्हणता येणार नाही.