मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरमधल्या दुकानांत विद्यार्थ्यांसाठीं मराठी, इंग्रजी व हिंदी छोटी छोटी पुस्तकें मिळतात. त्यांत मुख्यत्त्वेंकरून शास्त्रज्ञांची चरित्रें असतात. टागोरांचें देखील आहे. चि. लहान असतांना मिं त्यापैकीं दहापंधरा घेतलीं होती. त्यांत कुरियनांचें होतें. हरित क्रांतीवाले ... नांव आठवत नाहीं. त्यांचे देखील होतें. हल्लींच एका स्नेह्यांच्या छोट्या पुस्तकप्रेमी मुलाला सर्व पुस्तकें दिली. हा छोटा आपलीं खेळणी दुसऱ्याला देतो. पण पुस्तकें नाहीं.
सुधीर कांदळकर