आहे. स्पॅनिशमध्ये v चा उच्चार ब होतो. आणि ग्रीक मध्यें बीटा चा उच्चार व्ह होतो. पोर्तुगीज मध्यें तसाच कांहींसा असावा. आपण इंग्रज उच्चारांप्रमाणें वाचतांना बसीन रोड वाचतों. पण मराठी/हिंदीत वसईच म्हणायला पाहिजे.
माझ्या माहितीप्रमाणें सायन हें नांव विठ्ठल सायन्ना यांच्या नांवावरून दिलेलें आहे. मामुली बिगारी म्हणून सुरुवातीला काम करणारे हे गृहस्थ नंतर पालिकेचे मोठे कंत्राटदार
बनले आणि त्यांनीं बरींच लोकोपयोगी बांधकामें केलीं होतीं. मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे म्हणून त्यांचे नांव शीव परिसराला
दिलें आहे.
सुधीर कांदळकर