'शीव येथे शिवाचे मंदिर आहे म्हणून तेथे रेल्वेने शीव स्टेशन बांधले. हिंदूंच्या देवळाचे नाव स्टेशनास दिल्यामुळे मुसलमान चिडले म्हणून मग मशीद स्टेशन बांधले. मग पारशी चिडले म्हणून पारसिक स्टेशन बांधले. सरतेशेवटी ख्रिस्ती चिडले म्हणून सांताक्रूझ स्टेशन बांधले.' अशा अर्थीचा चिं. वि. जोश्यांचा विनोद पूर्वी वाचलेला आहे.
विनोदाचा भाग सोडल्यास, 'गावाची सरहद्द' म्हणून 'शींव' हे सयुक्तिक वाटते. (चूभूद्याघ्या.)