उत्तम पुस्तकपरिचय. लेखिकेची 'पॅशन' या लेखातून सतत जाणवत राहते, हे या लेखाचे 'आणखी' एक वैशिष्ट्य.
अर्थात पुस्तक वाचताना एक गोष्ट मात्र खटकते. शाकाहारी गुजराथामध्ये
आपल्यासारखा ख्रिश्चन मांसाहारी माणूस इतका सहज सामावला जातो याबद्दल
अप्रूप असू शकतं पण त्याचा मुद्दाम उल्लेख केला नसता तरी चालले असते.
बाकीच्या स्फूर्तीप्रद लेखनाला उगाचच आत्मप्रौढीची कळेल न कळेलशी छटा
प्राप्त झाल्यासारखं वाटायला लागतं. डॉक्टरांनी आपल्या ख्रिश्चनपणाचा
उल्लेख दोन तीन वेळा केला आहे. हिंदू संघटनेकडून गोवंशाच्या वृद्धीसाठी
केलेल्या प्रयत्नांबद्दल मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख मुद्दाम वेगळा
करावासा वाटणेही मला जरासे खटकले.
हे जाणीवपूर्वक केले असावे असे वाटते. अमूलची कथा मी 'केस स्टडी' म्हणून शिकवतो. अमूलचे बोधवाक्य काय? 'टेस्ट ऑफ इंडिया' अमूलच्या जाहिरातीत सतत भारतीय शाकाहारी पदार्थ, दूध, दही, लोणी, लस्सी, पराठे, पावभाजी असे उल्लेख असतात. भारतीय संस्कृती - अगदी श्रीकृष्णापासूनचे सगळे उल्लेख - हे अमूलचे जाणीवपूर्वक केलेले 'पोझिशनिंग' आहे. अमूलची यशस्वी आणि अयशस्वी उत्पादने पाहिली तर हा फरक सहज कळून येईल. अमूल दूध, दही, लस्सी, लोणी हे सगळे यशस्वी ठरले, पण अमूल 'रेडी टु सर्व्ह' पिझ्झा ग्राहकांनी स्वीकारला नाही. अमूलचे लो फॅट लोणी 'अमूल लाईट' ही बाजारात तग धरून राहाण्यासाठी धडपडते आहे. अमूलने जर चिकन बाजारात आणले तर ते खपेल का? बहुदा नाही. आणि जर बीफ आणले तर? बापरे! अमूलच्या इतर उत्पादनांचा खपही ढासळेल. त्यामुळे शाकाहारी असणे ही अमूलची 'इमेज' आहे. कळत नकळत हिंदुत्व हीसुद्धा अमूलची इमेज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे हे उल्लेख सुसंगत वाटतात.
'अमूल' या नावाविषयी माझ्या मनात थोडा गोंधळ आहे. 'आणंद मिल्क उत्पादक ****** लि. ' हे 'अमूल'चे स्फूर्तीस्थान आहे का?
अवांतरमध्ये नेस्टले हा उच्चार. इथे 'टी' सायलेंट आहे. 'नेस्ले' असा तो उच्चार आहे. अर्थात हे बिलकुलच महत्त्वाचे नाही.
दीर्घ आणि सुंदर लेखाबद्दल आभार, अदिती.