आणि मग सरतेशेवटी, हे सर्व कमी झाले म्हणून किंवा इंग्रज कमी पडले म्हणून, आपण शिखांसाठी 'गुरू तेजबहादुर नगर' असा बदल करून जुने मूळ भूमिपुत्रांचे कोळीवाडा हे नाव पुसून टाकले!

सीमा वरून शीव आले. 'मा' मधले अनुनासिक शींव मध्ये अनुस्वार स्वरूपात राहिले होते ते १९६२ मध्ये शु̮. ले. चे नवीन नियम अस्तित्वात आल्यावर उडाले.  पूर्वीच्या माहिम राज्याची अथवा प्रांताची शीव ही पूर्वसीमा होती. शीव स्थानकाचे अगदी सुरुवातीचे नाव ब्रिटिश नामकरणपद्धती(नॉमेंक्लेचर)नुसार माहिम रोड असेच होते. म्हणजे माहिमला जाण्याचा रस्ता इथून निघतो, अर्थात माहिमला जाण्यासाठी इथे उतरावे असा अर्थ.