श्री. संजय यांच्या प्रतिसादाचा पूर्ण आदर करून, मी आपणाला या परिस्थितीकडे वेगळ्या द्रुष्टिकोणातून पाहण्याचा सल्ला देईन.
१०० वाहिन्यांच्या आजच्या जमान्यात एकमेव दूरदर्शनवर लागणारं जुनं 'महाभारत' वरचढ वाटतं. आज २४ तास लागत असल्या तरी तेव्हाच्या '७ च्या बातम्या' किती आतुरतेने पाहिल्या जायच्या!.
अहो! त्या आठवणी आहेत.
आणि त्या आता 'वर्तमानकाळ' नाहीत; ही जाणीव कुठेतरी व्हायचीच की...
...
त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वच्छंदी झुला आणि त्याचवेळी आजचा क्षण कसा उद्यासाठी आनंददायक करू शकाल, हे बघा.
तुम्ही त्याकाळी जे अनुभवलत, ते आता तुमचा सव्वा वर्षांचा मुलगा अनुभवेल. त्यात रमा.
...
असो! माझ्या या प्रतिसादाकडे 'प्रबोधन' वगैरे म्हणून पाहू नका. फक्त 'हुरहूर' म्हणण्याऐवजी 'ओल्ड मेलोडी' म्हणून जपा; असा सल्ला द्यायचाय मला.
धन्यवाद.