अमूलचा हा 'शाकाहारी ' पैलू लक्षात आला नव्हता. हा एक वेगळाच कोन आहे. आता यावर विचार करायला हवा.
बाकी अमूल हे अमूल्य या शब्दाचे एक रूप आहे आणि ते A M U L या अक्षरांपासून तयार होणाऱ्या संस्थेच्या नावाचं लघुरूप आहे (ऍक्रोनीम) हेही पुस्तकात आल आहे. फक्त ती सगळी कथा बरीच रंजक असल्यामुळे वाचकांचा रसभंग होऊ नये म्हणून मी त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला होता.
नेस्ले बद्दल आभारी आहे! कशी कोण जाणे पण ही चूक मी वर्षानुवर्षे करत आले आहे हे लक्षातही आलं नव्हतं. त्यामुळे ओशाळल्यासारखं वाटायला लागलं. (पण मग नेस्ले म्हणजे शेवटी एक यांकी भांडवलशाही कंपनी आहे, त्यामुळे जोवर तिला इथून पैसे मिळतायत तोवर नेस्ले हे नाव
कसंही उच्चारलं गेलं तरी तिला फरक पडणार नाही असा विचार करून मी स्वतःचं समाधान करून घेतलं. ;) )
या गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल खरंच आभारी आहे. एरवी यांच्याकडे सहज दुर्लक्ष झालं असतं.
--अदिती