केवळ उच्चारचुकीमुळें एका 'स' चा अनवधानानें लोप झाला आहे. हा लेख मीं वाचला होताच. अचूक उच्चारांमुळें आज जगभर भारतीय लोकांची इंग्रजी वाखाणली जाते. अचूक उच्चारांमुळें मराठी लोकांचें संस्कृतोच्चारही असेच वाखाणले जातात. तेव्हां आपली चांगल्या उच्चारांची परंपरा आपण जपणेंच श्रेयस्कर. सबब हें नांव निदान मराठींत तरी मानससरोवर असेंच लिहिण्यांत यावें. यांत घड्याळाचे कांटे उलटे फिरवण्यांत येत आहेत असें मला तरी नक्कीच वाटत नाहीं.

उत्तर प्रदेशांत नजीबाबाद इथल्या एका कारखान्याचें नांव 'मानसरोवर कूल ड्रिंक्स' असें होतें. कंपनीच्या लेटरहेडवरही मान्सरोवर असेंच छापले होतें. तें मला खटकत असे. नंतर हा कारखाना कोका कोला नें विकत घेतला. एकदांचे कानाला खटकणारें नांव वाचायला लागणार नाहीम म्हणून मला बरें वाटलें होतें. हा लेख वाचून मला आनंद झाला. आहे, कोणीतरी जागे आहे म्हणून.

प्रस्तुत मूळ लोकसत्तामधील लेखिकेनें केवळ एका विशेषनामासाठीं घेतलेली प्रचंड मेहनत स्पृहणीय आहे. हीच वृत्ती आपल्या संस्कृतीचा कणा आहे.

सुधीर कांदळकर