तसेच ती कंपनी अमेरिकन (यँकी) नसून स्विस आहे.
बरोबर.
ऍलेमॅनिक जर्मन भाषेत 'नेसल' म्हणजे छोटे घरटे.
बरोबर.
त्या कंपनीच्या नावाचा उच्चार जरी इंग्रज-भाषिक देशात 'नेस्ले' केला जात
असला
बरोबर.
तरी मूळ उच्चार 'नेसल' (इंग्रजी क्रियापद nestle सारखा) आहे.
विकीवर म्हटले असले तरी मूळ उच्चार 'नेसल' असा आहे असे म्हणता येईल की नाही याबद्दल साशंक आहे. कारण संस्थापकाचे नाव आंरी नेस्ले यावरून कंपनीचे नाव पडले असे मानले, तर संस्थापक फ्रेंचभाषक स्विस असल्याकारणाने त्याच्या नावाच्या फ्रेंच उच्चाराप्रमाणे कंपनीचे नाव 'नेस्ले' असेच असायला हवे. (शेवटच्या 'ई'वरचा ऍक्सेंट मार्क लक्षात घ्यावा.) मात्र विकीत म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात कंपनीच्या नावाचा प्रचलित/लोकप्रिय उच्चार 'नेस्ल' असा होत असणे शक्य आहे. पुढे जाहिरातींकरिता श्राव्य माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मूळ फ्रेंच उच्चार 'नेस्ले' अधिक प्रचलित होऊ लागला, असे पुन्हा विकी सांगतो.
त्यामुळे, 'नेस्ले' या उच्चाराचा कोणत्याही यँकी उच्चाराशी काहीही संबंध नसून, थेट मूळ स्विस-फ्रेंच नावाशी आहे. 'नेस्ल' हा त्याचा (योगायोगाने सार्थ, आणि म्हणून लोकप्रिय) स्विस-जर्मन अपभ्रंश म्हणता येईल.
(सर्व माहिती आपण दिलेल्या विकीदुव्यावरूनच उचललेली आहे.)