बियाँ बोर्ग, साल आठवत नाहीं, बहुधा १९७६, हा टायब्रेकरच्या जमान्याच्या आधींचा सर्वांत जास्त काळ लांबलेला सामना होता. दोन सेट दहा गेम्सच्या वर आणि एक तर २६-२४ असा होता. नदाल फेडरर सामन्यापेक्षां माझ्या मतें बियाँ बोर्ग वि. जॉन मॅकेन्रो हा १९८० चा सामना जास्त थरारक होता. त्यांत एकदा पायाखालीं टप पडणारा चेंडू परतवतांना २० वर्षांचा मॅक पडला. पुढच्याच गेममध्यें त्यानें बोर्गच्या पायाखालीं तश्शाच कोनांत चेंडू मारला आणि बोर्ग तस्साच पडला होता. मॅकनें बेसलाईनवरून खेळणाऱ्या बोर्गला प्रथमच पुढें खेंचलें होतें. तर बोर्ग प्रथमच एवढ्या आधिक्यानें सर्व्ह अँड व्हॉलीचा खेळ खेळला, तोही यशस्वीपणें. मॅकचें कौतुक अशासाठीं कीं टेनिसच्या इतिहासांत प्रथमच बोर्गकडे स्पाईक्सचे बूट आणि ग्राफाईटची रॅकेट होती तर मॅक जुन्या साहित्यनिशीं खेळत होता आणि आयर्लंडविरोधी प्रेक्षक हुर्यो उडवत असतांना लाईन्समनच्या कांहीं खराब निर्णयामुळें तसेंच बोर्गच्या दुर्दम्य विजिगिषेमुळें मॅक हारला. नंतर वर्तमानपत्रांत कळलें कीं बोर्ग पोटदुखीनें त्रस्त होता.

सुधीर कांदळकर