मनातून येथे हे वाचायला मिळाले:
तिला आज बिलकुल चैन पडत नव्हती. office च काम पटापट संपवून केंव्हाची घड्याळ पाहत बसली होती, तीन मिनिटात अकराव्यांदा तरी तिची नजर त्या घड्याळाकडे गेली असेल. “शी बाबा, अजून अर्धा तास, कधी संपणार कोण जाणे? हि वेळ न नको तेंव्हा पळत असते आणि आज जाता जाईना”. पुन्हा एकदा चौफेर नजर टाकून तिनं पाहून घेतलं बोस नाहीये ना, नाही तर आपल्याला नुसत बसलेल बघून काम द्यायचा. शेजारी कोणाच आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिला हायस वाटल, खुर्चीवर रेलून मागे मान टाकून तिचे विचार सुरु झाले. आज 1 महिना झाला, आपण त्याच्याशी बोललो नाही, किती फोन आले त्याचे, किती ...