शेखर, हुरहूर हा वेगळा प्रकार आहे तो तुम्हाला कशातच रमू देत नाही. माझ्या मतांचा आदर करण्याचा प्रश्न नाही. या मानसिकतेतून जाणाऱ्याला ते कळू शकतं. आपण जो पर्यंत काहीतरी व्हायचं आहे, काहीतरी होईल अशा मानसिकतेत जगत असतो तो पर्यंत ती जाणवत नाही. ही हुरहूर बुद्धाला लागली होती, सगळं ठीकठाक आहे पण बेचैनीचं कारण सापडत नाही अशी ती अवस्था आहे आणि ही अवस्था तुम्हाला सत्याचा (निराकाराचा) शोध घ्यायला लावते. तुम्ही नवी रमण्याची कारण, नवे प्रकल्प, जीवनाचे नवे हेतू शोधलेत तर ती काही काळ फक्त दडपली जाईल पण एकदा का निराकार गवसला आणि आपण निराकार आहोत हे समजलं की मग सगळी धमाल आहे म्हणून हा प्रतिसाद लिहिला. ही हुरहूर खरंतर प्रत्येकाला आहे पण तिची खुली चर्चा होत नाही. तुम्ही माझे लेख वाचलेत तर तुम्हाला मी काय म्हणतो ते कळेल.

तुम्ही लेखीकेचं संपूर्ण कथन, इथे लिहीण्यासाठी घेतलेल्या नांवातून दिसणारी अभिलाषा सगळ्याचा नीट मागोवा घ्या. ही हुरहूर म्हणजे प्रत्येकाची अस्तित्वगत अस्वस्थता आहे.

संजय