विकीवर म्हटले असले तरी मूळ उच्चार 'नेसल' असा आहे असे म्हणता येईल की नाही याबद्दल साशंक आहे. कारण संस्थापकाचे नाव आंरी नेस्ले यावरून कंपनीचे नाव पडले असे मानले, तर संस्थापक फ्रेंचभाषक स्विस असल्याकारणाने त्याच्या नावाच्या फ्रेंच उच्चाराप्रमाणे कंपनीचे नाव 'नेस्ले' असेच असायला हवे. (शेवटच्या 'ई'वरचा ऍक्सेंट मार्क लक्षात घ्यावा.)

- कंपनीचा संस्थापक फ्रेंच/फ्रेंचभाषक नसून जर्मन होती. त्याचे मूळ नाव हैन्रिक नेसल (Heinrich Nestle - 'e'वर ऍक्यूटचिह्न नाही) होते. त्याचा जन्म १०-०८-१८१४ रोजी जर्मनीत फ्रँकफूर्ट येथे झाला. नेसल कुटुंब मूळचे दक्षिण स्वॅबियन जर्मनीतले. जर्मन भाषेच्या स्वॅबियन बोलीभाषेत 'nestle' म्हणजे पक्षाचे छोटे घरटे. ह्या कुळाची स्थापना हान्स, हैन्रिक व सॅम्यूएल नेस्त्लीन ह्या तीन भावांपासून १६व्या शतकात झाली. तीन भाऊ व छोटे घरटे म्हणून त्यांनी खालील चित्र आपलं कोट ऑफ आर्म्स म्हणून घेतलं. हेच कंपनीच्या संस्थापकाने आपल्या कंपनीचे चिह्न म्हणून निवडले.


हैन्रिक नेसल स्वीत्झरलँडच्या एका फ्रेंच-भाषिक भागात फार्मासिस्ट/केमिस्ट म्हणून राहात असताना १८३९च्या सुमारास त्याने आपले मूळ नाव बदलून Henri Nestle (e वर ऍक्यूट चिह्न वाचावे. हे कसे टंकायचे? ) असे आपल्या नावाचे फ्रेंचीकरण केले. संपूर्ण माहिती इथे पहा.