तरीही अजून हापूस आपली सद्दी
टिकवून आहे. किती काळ तग धरतो ते बघायचे.
कारण अलीकडे तो फारच बेभरवशाचा होत चाललाय. कितीही नावाजलेल्या बागेतून
घ्या, काही नग तरी लासे असलेले निघणारच.
बरे झाले कळले. मला वाटायचे फक्त माझ्यासोबतच असे
घडते आहे.
हापूसचा? छे! ज्या ज़ाड घट्ट लगद्यात पुरी बुडता
बुडत नाही किंवा
जोरजबरदस्तीने बुडवावी लागते, तो कसला रस? पूर्ण पिकलेल्या लाल
केशरी पायरी
आंब्याच्या प्रवाही सुगंधी रसात बोटे पुरीसह कशी अलगद बुडतात. असे नेमके,
योग्य, ऑप्टिमम विशिष्टगुरुत्वच आपल्याला आवडते
बुवा.
वाव्वा ! पुरीसह कशाला ! पायरी माचून थेट रस प्यावा.
तर हापूस या कृषिउत्पादनाचे पेटंट घेतले आहे किंवा घ्यायचे चालले आहे ते
मूळ 'आफ़ाँस' या नावाने की हापूस या नावाने?
हापसासाठी भौगोलिक सूचक (जिओग्राफ़िकल इंडिकेशन) घेता येईल बहुधा.पेटंट घेता येणार नाही, असे वाटते.