माझ्या विश्वात... येथे हे वाचायला मिळाले:
साधारण दुपारी दोन अडिचची वेळ असेल, चींगी आपल्या कडेवरच्या सव्वा वर्षाच्या नाम्याला सांभाळत लोकलमधुन माहिम स्टेशनवर उतरली. चींगी असेल साधारण दहा वर्षाची, उन्हातान्हात फिरुन तिचा काळा सावळा वर्ण अधिकच गडद वाटत होता, तिचे कपडे जागोजागी फाटले होते आणि त्यावर ठिगळ लावली होती, तिचे केस एकदम निस्तेज आणि विस्कटलेले होते, तिची अंगकठि अगदि बेताचीच होती. तिच्या कडेवरचा नाम्या तिचा लहान भाऊ होता. अशी हि चींगी हळुहळु आपल्या झोपडिच्या दिशेने निघाली. सकाळपासून लोकल गाड्यातुन फिरुन ती खूप दमली होती, नाम्यापण तिच्या कडेवरच झोपी गेला होता. ती त्याला सांभाळत ...