विंबल्डनचा उल्लेख या माणसाशिवाय पुरा होऊ शकत नाही. अतिशय झंझावाती सर्विससाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू वर्षभर गायब असायचा. पण विंबल्डन या एका स्पर्धेत त्याचा खेळ बहरत असे. १९९२ पासून किती तरी वेळा तो अंतिम सामन्यापर्यंत पोचला पण विजेतेपदाने त्यास सतत हुलकावणी दिली. शेवटी मला वाटते २००२ का ३ साली तो एकदा ही स्पर्धा जिंकला होता.