मध्यंतरी पुण्याच्या 'नाय्क्रोम' नावाच्या कंपनीच्या मालकांनी लिहिलेले आत्मचरित्र वाचनात आले होते. त्यात अमूल आणि डॉ. कुरियन वर एक मोठे प्रकरणच आहे. नाय्क्रोमने  उत्पादित केलेली/निर्माण करीत असलेली यंत्रसामुग्री मुळात उत्पादितच होऊ नये आणि झालीच तर बाज़ारात येऊ नये यासाठी डॉ.कुरियन आणि अमूल यांनी केलेल्या खटपटीचे कहाणी त्यात आहे. पुस्तकाचे नाव इ. संदर्भ या क्षणी हातात नाहीत.

डॉ. कुरियन यांच्या एरवी धवल कारकीर्दीवर शेवटी शेवटी एकाधिकारशाहीच्या  आरोपांचे शिंतोडे उडाले. अर्थात त्यामुळे त्यांचा धवलपणा फारसा डागाळला नाही. 

जाता जाता :  अमूलच्या कल्पक जाहिरातींचे श्रेय पूर्णपणे कै.बेहेराम काँट्रॅक्टर (आडनावाबाबत जोरदार शंका येतेय. चूभूदेघे.) या पारसी जाहिराततज्ञाचे  आहे. त्यांच्यानंतर अमूलच्या जाहिरातींत पूर्वीची चमक आणि पकड राहिली नाही.

आणखी जाता जाता : 'खेडा' हाच मूळ शब्द आणि मूळ उच्चार आहे. त्याच्या ब्रिटिश  कृत स्पेलिंगचाही 'खेडा' हाच उच्चार ब्रिटिशांना अभिप्रेत आणि अपेक्षित होता. आपण भारतीयांनी तसे केले नाही हा भाग वेगळा.