त्या विदुषीबद्दल एकही अनादराचा शब्द नाही. तसा उद्देशही नव्हता. तसेच मानससरोवर या शब्दाबद्दलही चर्चा नव्हती.त्या विदुषीचा तो लेख केवळ एक निमित्त होता. कालौघात कित्येक गोष्टी बदलतात. मानववंशसुद्धा. भाषा त्याला अपवाद नाही‌. सद्ध्या संगणक आणि जालीय भाषेमधे तर प्रकर्षाने सुकरतेकडे  आणि लघुत्वाकडे वाटचाल चालू आहे. हे लोण छापील माध्यमांपर्यंत आणि छापील ग्रंथ आदि वाङ्मयापर्यंत येऊन पोचणारच आहे. हा बदलाचा कल अधोरेखित करावयाचा होता इतकेच. छापील ग्रंथादि अभिजात वाङ्मयात आपण काही शब्द जतन करून ठेवू शकू,  कायद्यानेही 'काही शब्द असेच वापरले पाहिजेत' असेही म्हणू  शकू कदाचित, पण लोकव्यवहाराचे काय? सर्वसामान्य लोकव्यवहारातूनच नव्या वळणांचा जन्म होतो. अपवाद: उत्तुंग प्रतिभेचा अथवा जनमानसावर अधिराज्य गाजवणारा एखादा महामानव. त्याचे वर्तन, कलाकृती त्यामुळे सामान्य जनव्यवहार बदलू शकतो.

आता मराठी लोकांच्या संस्कृत उच्चारांविषयी. इतर भाषिकांच्या मानाने(च) आपले सं. उच्चार बरे असले तरी जोडाक्षरामागच्या शब्दावर अतिरिक्त आघात देणे किंवा त्याचे द्वित्व करणे ही मराठीची खोड संस्कृतातही चालविल्यामुळे मराठी लोकांच्या तोंडची संस्कृत भाषा कर्णकटू आणि कर्णकठोर वाटते.  तसेच विसर्गाचाही उच्चार नीटसा होत नाही.