मराठीतल्या देशी शब्दांमध्ये जोडाक्षराआधीच्या अक्षराचे द्वित्व होत नाही. तसे ते मराठीतल्या संस्कृत शब्दांमध्ये होते(आघाताच्या बाबतीतही तेच); यावरून ही द्वित्वाची अथवा आघाताची प्रवृत्ती मराठीची नाही हे खरे असले तरी मराठी भाषकांचे संस्कृत अतिकठोर आणि कर्णकटु(त्या अति आघात व द्वित्वामुळे) वाटते.