वासुदेवचे असे स्पेलिंग असणे ही फारशी नवलाईची गोष्ट नाही. Pass पास, म्हणून wass वास. जगन्नाथ शंकरशेठ आपल्या नावाचे स्पेलिंग Jagunath Sunkersett असे करीत. Shankar असे केले असते तर ते शँकर झाले असते. मेनका गांधी मेङ्का किंवा मेनाका असा उच्चार होऊ नये म्हणून एम्एएन्ईकेए असे स्पेलिंग करतात. Mane= मेऽन. पुढे का आहेच. म्हणून अस्सल मराठी-संस्कृत उच्चार मेऽनका.
इंग्रजी स्पेलिंगमध्ये व्ही केव्हा आणि डब्ल्यू केव्हा वापरायचा याचे काही अलिखित ठोकताळे आहेत. आद्य व, वि, वै वगैरेंकरिता व्ही. म्हणून वसंत, विद्याधर, वैजयंती, वडा वगैरे. संस्कृत नावांमधील आद्य 'वा'साठी व्ही. म्हणून वासंती, वासुदेव, वाचस्पती, वाङ्मय, यांची स्पेलिंगे व्हीने. थोडासा अपवाद 'वामन'चा. हे स्पेलिंग साधारणपणे डब्ल्यूपासून सुरू होते, पण वि. वा. हडप, वि. वा शिरवाडकर आदीं लेखक त्यांच्या वडिलांच्या वामन या नावाचे स्पेलिंग व्हीएएम्एएन करीत. 'वा'सुरुवातीला किंवा मध्ये असला तरी इतर भारतीय नावांत डब्ल्यू चा उपयोग. वाकडेवाडी , गांजावाला, आगरवाल, वाडा, वागळे, कावासाकी, टांगेवाली वगैरे. ज्या शब्दांत व् असा उच्चार असतो तिथे व्ही, व पूर्ण असेल तर डब्ल्यू. उदाo कांदिव्ली, जाधव् यांत व्ही; परंतु के-वला-नंद, बेवफ़ा, विश्वनाथ. हे नियम नसून केवळ ठोकताळे असल्याने त्यांना नियम सिद्ध करण्यापुरते अपवाद सापडतीलच!--अद्वैतुल्लाखान