मेंदूपेशीऱ्हासामुळे होणारा डीमेन्शिआ विशेषतः अल्झाय्मर रोगग्रस्तांना फार जवळून पाहिले असल्याने काही काही प्रसंग मनाला भिडले. विशिष्टविस्मरण, भ्रम, भास, एकेक अवयव निकामी होत जाणे, स्वतः काहीच करू न शकणे, भरवलेले अन्न गिळताही न येणे आणि तरीही जिवंत असणे अशा क्रमा-क्रमाने बिघडत जाणाऱ्या अवस्थेत रोगी आठ दहा वर्षे खितपत पडून असतो.अतिशय वाईट अवस्था. कुणाचीही न होवो.
म्हातारपणी किंवा कधीही परावलंबित्व कठीण. तेही कुणाच्या वाट्याला न येवो.