लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:

पु. ल. देशपांडे, सौजन्य – मटा

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ’ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु ,नारी , ये सब ताडनके अधिकारी ’ म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं ,खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!

बायकांना नव-यांनीलाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांतसर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातचअसं नाही. पुष्कळदा मला वाटतं ...
पुढे वाचा. : मी भारतीय म्हणूनच जगेन