आपण मूळ भारतीय(आणि जागतिक) भाषेतले विशेष नामांचे लिखाण सहसा वाचत नाही, वाचतो ते त्याचे इंग्रजीच्या रोमन लिपीत केलेले लिप्यंतरण. निप्पॉन हा शब्द इंग्रजीत जपान असा लिहितात, म्हणून आपण जपान म्हणतो. असेच डॉइचलॅन्‍ड(की लान्‍ट? )चे 'जर्मन' होते. भिंडराँवाले आणि जालियाँवाला  यांची उदाहरणे अगदी चपखल आहेत.--अद्वैतुल्लाखान