थिरुअनंतपुरम (थिरू = श्री) नावाने केरळी लोक सुखावले.
त्यांना सुखावू दे. पण पाच पूर्णाक्षरे असलेल्या नावापेक्षा अधिक मोठी विशेष नामे इतर भाषांत सहजासहजी स्वीकारली जात नाहीत. तसेच विचित्र स्वरांनी शेवट होत असलेली व फार जोडाक्षरे असलेली नावे. उदा. चेन्नै, इट्टलि, दोसै वगैरे. या नामांना मराठी प्रत्यय लावता येतीलच अशी सोय नसते. म्हणून आपण मराठीत त्यांना अनुक्रमे चेन्नई, इडली, डोसा वगैरे करून घेतले आहे.
अवांतर : चेन्नैपेडु आणि मद्रासपेडु या नावाची दोन छोटी गावे होती. एकात डचांची आणि दुसऱ्यात इंग्रजांची वखार होती. पुढे इंग्रजांनी पराभव केल्यावर डच भारत सोडून स्वदेशी परतले. दोन्ही गावे वाढतवाढत एकमेकात मिसळून गेली. इंग्रजांनी त्या गावाला इंग्रजीत मद्रास म्हणायला सुरुवात केली तर तमिळी लोकांनी त्यांच्या भाषेत चेन्नै. पहिल्यापासून दोन्ही नावे अगदी आत्ताआत्तापर्यंत गुण्यागोविंदाने नांदत होती. मुंबईचे मंबाई होईपर्यंत तिची मुंबई, बंबई, मुंबै, मुंबापुरी आणि बॉम्बे ही सर्व नावे जशी प्रचलित होती, त्याचप्रमाणे. इतर भारतीयांच्या दृष्टीने चेन्नई आणि मद्रास आजही आहेत! चेन्नईचा इतिहास हा असा आहे.
---अद्वैतुल्लाखान