विजय,
असा जो लाह्यांचा, पोह्यांचा अथवा चिरमुऱ्यांचा उपमा बनवतात त्याला उत्तर कर्नाटकात "सूऽऽस्ला" असा शब्द वापरतात. (मी स्वतः विजापूरचा म्हणजे उत्तर कर्नाटकातला आहे आणि आम्ही घरात सर्रास हा शब्द वापरतो)म्हणजेः
कांदेपोहेः अवलक्की सूऽऽस्ला......(अवलक्की म्हणजे पोहे)
लाह्यांचा उपमाः अळ्ळीन सूऽऽस्ला......(नुसतंच अळ्ळू म्हणजे ज्वारीच्या लाह्या)(अरळू योग्य शब्द.. अपभ्रष्ट रूपः अळ्ळू)
चिरमुऱ्याचा उपमाः चुरमूरी सूऽऽस्ला.....(चुरमूरी म्हणजे चिरमुरे)
कदाचित हीच व्युत्पत्ती असावी या "सुशिले"ची....
चू भू दे घे
कृष्णकुमार द. जोशी
(अवांतरः पोहे जाड असतील तर दप्प अवलक्की आणि पातळ असतील तर तळ्ळ अवलक्की. काही उत्तर कर्नाटकी लोक चुरमूरीच्या ऐवजी चुनमूरी असेही म्हणतात. भाताची लाही=भत्तरळू)