पंजाब राज्यामधल्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या बटाला तालुक्यात जलियां(Jallian) हे एक खेडेगांव आहे. तिथले एक रहिवासी जलियाँवाले. त्यांच्या मालकीची  बाग(मोकळी जागा) ती जलियाँवाले बाग. इंग्रजीत, जलियानवाला बाग.  मराठीत ती जालियनवाला बाग झाली. या बागेचा जाळीच्या खिडक्यांशी काही संबंध नसावा. 

अमराठी विशेष नामांच्या उच्‍चाराचा आपला संबंध बहुधा फक्त इंग्रजी स्पेलिंगमार्फत येतो  हेच यातून  शेवटी प्रकर्षाने जाणवते.  ममता बॅनर्जी आपल्या नावाचे  स्पेलिंग Mumta करतात, म्हणून त्यांचा उल्लेख अनेकजण मुम्ता या नावाने करतात. परदेशी नभोवाणी-चित्रवाणींवरून मुंबईला मंबाई म्हटलेले ऐकू येते, हे अनेकांच्या ध्यानात आले असेल.
--अद्वैतुल्लाखाँ