झुणका म्हणजे घट्ट पिठले, हे बरोबर.

माझ्या माहितीप्रमाणे, पिठल्याचे (किमान) तीन प्रकार.

१. पातळ पिठले (द्रवरूप).
२. झुणका (घट्ट).
३. गोळ्याचे पिठले (द्रवरूप, पण अध्येमध्ये गुठळ्या असलेले).

पिठल्यात सुके खोबरे घालण्याबाबत मीही प्रथमच ऐकतोय.

म्हणजे फेकून मारले तर खोक पडेल इतक्यापेक्षा थोडे कमी घट्ट.

साधारणतः श्रीखंडाची कन्सिस्टन्सी (मराठी?) म्हणता यावी. किंवा कदाचित त्याहून थोडे अधिक घट्ट. (ताजे, ओलसर असताना) फेकून मारले असता बहुधा चिकटावे, असे. (शेणाच्या पोवाशी तुलना [मनोमन] करून पहावी.) शिळे झाल्यावर/सुकल्यावर वड्या पाडता याव्यात.

आभारी आहे.

- टग्या.