"वृक्षायन"- "Trees are the earth's endless effort to speak to the listening heaven - Rabindranath " येथे हे वाचायला मिळाले:

कडुनिंबाच्या अर्कामुळे कीटकांच्या अंडी, अळी, कोष अशा विविध अवस्थांच्या वाढीस वेगवेगळ्या प्रकारे अडथळे निर्माण होतात, त्यांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कडुनिंबाचा वापरास मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
कडुनिंब (Azadirachta indica) या वृक्षाचे मूळ स्थान भारतीय उपखंड, ब्रह्मदेश आहे. महोगनी कुळातील हा वृक्ष १५-२० मी., क्वचितप्रसंगी ३५-४० मी. उंच वाढतो. जवळपास वर्षभर हरित राहणारा वृक्ष चांगलाच काटक आहे. कडुनिंब जवळपास सर्व प्रकारच्या माती प्रकारात वाढू शकतो. चांगली निचरा होणारी वालुकामय जमीन जास्त मानवते. राजस्थान, ...
पुढे वाचा. : गुढीपाडवा, कडुनिंब वाढवा प्रकाश ठोसरे, अरविंद आपटे