परवा मी एक पुस्तक आणण्यासाठी दुकानात गेलो तेव्हा तिथला मालक मला म्हणाला, 'हे पुस्तक तुम्हाला इथल्या कुठल्याच दुकानात भेटणार नाही. तुम्ही कदाचित प्रकाशकांकडेच बघा. तेथे कदाचित भेटेल. ' आता 'मिळेल' या शब्दाच्या जागी 'भेटेल' हा शब्द ऐकून मला गंमत वाटली.