पाव किलो डाळीच्या पिठासाठी एक वाटी तिखट?  आणि परत तिखटपणा कमी करून मिळमिळीत चव आणण्यासाठी एकेक वाटी दाण्याचा कूट आणि सुके खोबरे. छान पाककृती आहे.
कोरड्या पिठल्यासाठी, म्हणजेच झुणक्यासाठी चमचाभर तांबडे तिखट आणि घट्टसर पातळ पिठल्यासाठी दोनचार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, ही साधी मराठमोळी पद्धत.  पिठलेभात हे आयत्या वेळी किंवा दमल्यावेळी घाईघाईने करायचा  पदार्थ आहे.  मुदपाकखान्यात तयार झालेल्या शाही खान्याच्या बेतामध्ये बल्लवाचार्यांनी किंवा शेफांनी बनवलेल्या पिठल्याचा समावेश असेल अशी कल्पनाही करवत नाही.

कन्सिस्टन्सी म्हणजे एकजिनसीपणा, हे बरोबर आहे. उदाहरणार्थ अळूची भाजी जर 'मिळून' आली नाही तर चोथापाणी वेगळे दिसते. भाजी एकजिनसी करायसाठी त्यांत थोडा चुका आणि मुळ्याचे काप घालावे लागतात.
पोत म्हणजे वस्त्राच्या  विणकामाची सफाई. हाच शब्द तलमपणा या अर्थाने वापरला जाणे कितपत बरोबर आहे कोण जाणे? सोलापुरी चादर घट्ट विणीची असते, म्हणजे तिचा पोत चांगला आहे असे म्हणता येईल? (.)तलम या फारसी शब्दापासून तालिम्य हे भाववाचक नाव सहज बनू शकेल).

पिठल्याच्या बाबतीत मात्र पोत, तालिम्य, दाटपणा या विशेषणापेक्षा घट्टपणा, पातळपणा किंवा घट्टपात्तळपणा हेच शब्द लागू पडावेत. प्रवासासाठी मोकळे पिठले नावाचा पदार्थ करून नेतात. हा पदार्थ म्हणजे चक्क तिखट वाटल्या डाळीची भरभरीत चटणी-पूड असते. --अद्वैतुल्लाखान