आठवलं, १९५५च्या आसपास नारायणगांव (जि. पुणे) येथे श्री. श्रीकांत सबनीस यांनी कुक्कुटपालन व्यवसायाबाबत एकहाती चळवळ उभी केली होती. तेही परदेशात जाऊन या विषयाचा सखोल अभ्यास करून आले होते. माळरानावरची वरकस जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी प्रचंड विहीर खोदली होती. पण त्यात पाणी लागत नव्हते. त्यांनी उभ्या केलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील राजा कोंबडा व राणी कोंबडीला पारितोषिक मिळाले होते. (नुकतेच त्यांना कुठलासा पुरस्कार दिला गेल्याचे वाचनात आले होते.) मी त्यावेळी आठवीत होतो. वर्षभरात आम्ही नारायणगांव सोडले.
                एखाद्या सार्वजनिक कार्यासाठी तन-मन-धनाने जीवन समर्पित करणारे हे सारे आधुनिक दधिची होत. म्हणूनच आदराने नम्र होत 'तेथे कर अमुचे जुळती' असे आपण सारे म्हणत असतो.