Balsanskar >> Tejomay Itihas येथे हे वाचायला मिळाले:
कलकत्त्यातील सिमोलिया पथावर एक मोठे घर होते. त्या घरात विश्वनाथबाबू दत्त नावाचे एक नावाजलेले अधिवक्ता (वकील) रहात होते. त्यांची कीर्ती कलकत्त्यातच नव्हे, तर बंगालमध्ये गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र पोहोचलेली होती. त्यांच्या पत्नीचे नाव होते भुवनेश्वरीदेवी. आपल्याला मुलगा व्हावा; म्हणून भुवनेश्वरीदेवी काशीला गेल्या अन् काशीविश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या. एके दिवशी भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि दृष्टांत देऊन `तुझी मनोकामना पूर्ण होईल', असा आशीर्वाद त्यांना दिला. पुढे कलकत्त्यास आल्यावर ...